प्रत्येक समजदार व्यावसायिकाने खालील पूर्ण माहिती वाचूनच फॉर्म भरावा. या मध्ये फक्त आणि फक्त लेवा पाटीदार व्यावसायिक बांधवांनी च नोंदणी करायची आहे. प्रत्येक व्यवसायिकाने खरी माहिती भरावी. रजिस्ट्रेशन झाल्यावर आपण आपले एका पेक्षा जास्त व्यवसाय नोंदवू शकतात. आपण जर लेवा पाटीदार व्यावसायिक असाल तरच आपण या स्पेशल व्यावसायिक सूचित आपल्या व्यवसायाची नोंद करावी. कृपया झोलछाप , फसवेगिरी करणारे, कस्टमर सोबत वारंवार वाद घालणारे किंवा मुर्खासारखे व्यवसाय करणाऱ्यांनी नोंदणी करू नये. त्यांनी आम्हाला मनापासून माफ करावे. आपण हव्या त्या भाषेतून आपल्या व्यवसायाची माहिती भरू शकतात आपण जशी भराल तशीच ती पुस्तकात प्रिंट होईल याची नोंद घ्यावी.
Business name
मराठी मेसेज ( हव्या त्या भाषेतून आपल्या व्यवसायाचे नाव लिहावे.) ( जास्तीत जास्त १०० अक्षरात )
Owner Name हव्या त्या भाषेतून मालकाचे नाव लिहावे. एका पेक्षा जास्त मालक असतील तर शेजारील Add More यावर क्लिक करावे.
Business Type :-
( आपल्या व्यवसायाचा प्रकार निवडावा आपला प्रकार नसल्यास OTHER हे ऑप्शन निवडावे व आपला व्यवसायाचा मुख्य प्रकार आणि झाली उपप्रकार स्वतः लिहावा या ठिकाणी काहीही अडचण आल्यास त्वरित ऑफिस ला कळवावे किंवा मेसेज टाकावा )
Businesa Sub type :-
आपल्या व्यवसायाचा उपप्रकार निवडावा. आपला उप प्रकार नसल्यास OTHER हे ऑप्शन निवडावे
Business Firm आणि Business Speciality.
ही माहिती फक्त कार्यालयीन कामासाठी आहे ही माहिती पुस्तकात छापण्यासाठी घेण्यात येणार नाही अशी सर्व महत्वाची माहिती खालील Business Descriptions या मध्ये लिहावी.
लोगो
15cm बाय 80 cm ची इमेज आपल्या व्यवसायाची माहिती सूची मध्ये अधिक प्रभावी दिसण्यासाठी आपल्या व्यवसायाचा लोगो किंवा विशिष्ठ शैलिमधील नावाची इमेज आपल्याला छापून घ्यायची असल्यास हो म्हणावे आणि नंतर छानशी या साइज मध्ये डिझाईन करून अपलोड करावी. ( डिझाईन उत्तम क्वालिटी ची असावी आपल्याला डिझाईन करणे शक्य नसल्यास आम्हाला ८२७५०५४००१ या नंबर वर हर्शल जावळे यांना कळवावे. आम्ही आपल्याला डिझाईन करून देण्याचा प्रयत्न करू.
रजिस्ट्रेशन झाल्यावर आपण आपले एका पेक्षा जास्त व्यवसाय नोंदवू शकतात.( प्रत्येक व्यवसायाचे नोंदणी अहस्तरणीय शुल्क हे वेगवेगळे असेल )
आपण आपली माहिती पूर्ण केल्यावर माहिती बरोबर आहे आणि छापण्यासाठी ग्राह्य धरण्यात याची यासाठी आपली प्रोफाईल approval देऊन आम्हाला कॉल करून अनुमती देणे बंधनकारक आहे त्यानंतरही आमच्याकडून ती चेक करून आम्ही सुद्धा approved केली असल्याची खात्री स्वतः आपल्या लॉगिन मध्ये आणि फोन करून घेणेही बंधनकारक आहे. आमच्या चुकीमुळे जर आपली माहिती पुस्तकात छापली गेली नाही किंवा चुकीची छापली गेली तर आम्ही फक्त आपण भरलेली फी च परत करू शकतो त्या व्यतिरिक्त काहीही ऐकून घेतले जाणार नाही.
आपण जर खरे व्यवसायिक असाल तर आपल्याला प्रत्येक सेवेचे योग्य मूल्य करता येत असेलच म्हणून आपण आमच्या या उपक्रमाची योग्य किंमत आणि महती समजू शकतात आणि म्हणून आम्हाला समजून घ्यावे आणि शक्य ती मदत करावी आणि आमचे काही चुकत असेल तर योग्य अमूल्य मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.
या उपक्रमाचे सर्व हक्क लेवाशुभ्मंगल कडे राहतील आणि कोणताही नियम केंव्हाही बदलण्याचा , कोणत्याही प्रकारची फी परत करण्याचा किंवा न करण्याचा , या ग्रंथामध्ये कुणाचाही व्यवसाय नोंद घेण्याचा किंवा न घेण्याचा किंवा झालेली नोंदणी कधीही कुठलेही कारण किंवा पूर्वसूचना न देता बंद किंवा डिलीट, किंवा न छापण्याचा असे कोणतेही निर्णय घेण्याचे सर्व अधिकार हे लेवाशुभ्मंगल कडेच राहतील आणि हे मान्य असेल तरच आपण या मध्ये नोंदणी करायची आहे कारण या उपक्रमामध्ये आम्हाला त्रास होईल असे कोणतेही काम करायचे नाही आहे आणि त्याप्रकाचे वादग्रस्त व्यक्तीही नको आहेत अशा बांधवांनी आम्हाला माफ करावे.
समजात व्यावसायिकता वाढावी व्यावसायिकांचे उत्पन्न वाढावे आणि समाजबांधवांना सुद्धा योग्य सेवा योग्य मूल्य देऊन मिळाव्या यातून सर्वांचाच फायदा व्हावा म्हणून लेवा शुभमंगल तर्फे आलेल्या नफ्यातून पुढील काही काळात काही फ्री काही पेड कार्यक्रम समाजातील व्यावसायिकता वाढविण्यासाठी आणि समाज विकासासाठी घेण्यात येणार आहे.